केप टाउन – इस्रायल आणि हमास यांच्यात महिनाभराहून अधिक काळ चालू असलेल्या संघर्षाला सध्या विराम मिळाला आहे. ७ ऑक्टोबर या दिवशी आतंकवाद्यांनी इस्रायलवर आक्रमण केले आणि सैनिकांसह शेकडो लोकांना ओलीस ठेवले होते. आता एका करारानुसार काही ओलिसांची सुटका करण्यात आली आहे. हमासने इस्रायलसमोर एक नवीन प्रस्ताव ठेवला आहे. ‘जर इस्रायलने पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली, तर त्या बदल्यात इस्रायलचे सर्व सैनिक सोडले जातील’, असे हमासने म्हटले आहे.
हमासचे वरिष्ठ अधिकारी आणि गाझाचे माजी आरोग्यमंत्री बसेम नइम म्हणाले की, हमासचा गट युद्धविरामाचा कालावधी वाढवण्यासाठी कठोर वाटाघाटी करत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यावर असतांना नइम यांनी पत्रकारांना सांगितले की, इस्रायलमधील पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात हमास सर्व इस्रायली सैनिकांना सोडण्यास सिद्ध आहे.