स्वावलंबी आणि प्रेमळ ५४ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली सातारा येथील कु. कार्तिकी विनोद चव्हाण (वय ७ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. कार्तिकी चव्हाण ही या पिढीतील एक आहे !

कार्तिक कृष्ण तृतीया (३०.११.२०२३) या दिवशी कु. कार्तिकी विनोद चव्हाण हिचा सातवा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.   

कु. कार्तिकी चव्हाण

कु. कार्तिकी विनोद चव्हाण हिला सातव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

सौ. स्वप्ना चव्हाण

१. स्वावलंबी

‘कार्तिकी लहान असूनही तिला स्वतःचे स्वतः आवरायला आवडते.

२. ती प्रत्येक कृती परिपूर्ण करते.

३. प्रेमभाव

ती माझ्याविना जेवत नाही. मला बरे वाटत नसल्यास ती स्वतःचे स्वतः आवरते. ती भांडी घासायला तिच्या ताईला साहाय्य करते. ती घरातील केर काढते. तिच्या बाबांना बरे नसल्यास ती बाबांना औषधे देते. ती तिच्या बाबांचे डोके दाबून देते.

४. देवाची आवड

तिला कुणाच्याही साहाय्याविना देवाची पूजा करायला आवडते. ती देवासमोर रांगोळी काढते. ती फुले आणते आणि देवासमोर फुलांची रचना करते.

५. चुकांविषयी संवेदनशील

तिच्याकडून घरात किंवा बाहेर चूक झाल्यास ती मला सांगते आणि क्षमायाचना करते.

६. नामजपादी उपाय करण्याची आवड

ती नामजपादी उपाय करते. ती घरी असतांना आणि शाळेत जातांना अत्तर अन् कापूर लावते.

७. आश्रमात येण्याची ओढ

फेब्रुवारी २०२३ मध्ये आमचे आश्रमात येण्याचे नियोजन होते. ‘त्यातील अडथळे दूर व्हावेत’, यासाठी कु. आराध्या (मोठी मुलगी) आणि कु. कार्तिकी प्रार्थना करत असत अन् त्या मलाही प्रार्थना करायची आठवण करून देत असत.

८. कार्तिकीचे स्वभावदोष मनाप्रमाणे करणे आणि राग येणे.

– सौ. स्वप्ना विनोद चव्हाण (कु. कार्तिकीची आई), सातारा (२२.५.२०२२)