
कोल्हापूर – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची घोडदौड चालू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूर जिल्ह्यावर विशेष लक्ष आहे. शिवसेनेचे सर्व बालेकिल्ले पुन्हा मिळवण्यासाठी शिवसेना सज्ज असून वर्ष २०२४ मध्ये दक्षिणोत्तर शिवसेनेचाच भगवा फडकेल, अशी गर्जना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी केली. शिवसैनिकांच्या उत्साही वातावरणात श्री. राजेश क्षीरसागर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही श्री. राजेश क्षीरसागर यांना दूरभाषद्वारे शुभेच्छा दिल्या.
तत्पूर्वी सकाळी श्री. राजेश क्षीरसागर आणि सौ. वैशाली क्षीरसागर यांनी करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. यानंतर सौ. वैशाली क्षीरसागर यांच्या हस्ते पांजरपोळ येथे गोमातेचे पूजन करून गायींना डाळ, गूळ, चारा यांचे वाटप करण्यात आले, तसेच शिवसेनेच्या वतीने अन्नदान करण्यात आले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी यांनीही श्री. राजेश क्षीरसागर यांना भेटून शुभेच्छा दिल्या.
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते शुभारंभ
सासष्टी तालुक्यातील १ कोटी चौरस मीटरहून अधिक भूमी ‘विकासनिषिद्ध क्षेत्र’ म्हणून घोषित
आतंकवाद्यांचे समर्थन करणार्यांवर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्याचे कौतुक
अभिजीत दीपके याच्याशी बोलून आंदोलनाची दिशा ठरवणार ! – उद्धव ठाकरे
देशातील लोकशाहीने कात टाकली आहे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट