‘एका साधिकेच्या मृत्यूचे वृत्त ऐकून काही क्षण माझे मन अस्वस्थ झाले; पण पुढच्याच क्षणी गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) मला काही ओळी सुचवल्या आणि मन शांत झाले.
जिथून आले, तिथेच जर जायचे ।
तर मृत्यूला कशाला घाबरायचे ।। १ ।।
अनंतातून आलो, अनंतात विलीन व्हायचे ।
जणू सगुणानंतर निर्गुण होऊन जायचे ।। २ ।।
पृथ्वीतळी या यात्रेकरू बनायचे ।
आनंद सार्यातील घेऊन कशात नाही अडकायचे ।। ३ ।।
देहा यातना अनंत होती या यात्रेत ।
मात्र मन आनंदी असावे सदैव ।। ४ ।।
प्रवास करूनी थकलो अंती ।
आता करायची चरणी विसाव्याची भक्ती’ ।। ५ ।।
– सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.७.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |