कृतज्ञताभावात अखंड राहूया ।

सौ. ज्‍योती दाते

कृतज्ञतेचे पुष्प मोठे मनोरम ।
अर्पण करताच हरे स्वभावदोष अन् अहं ।। १ ।।

कृतज्ञतेची असे सारी किमया ।
कर्तेपणाला तिथे नसे थारा ।। २ ।।

कृतज्ञतेच्या कणाकणांत आनंद ।
व्यक्त करताच गवसे परमानंद ।। ३ ।।

कृतज्ञतेनेच व्यापून अवघे जीवन ।
आयुष्य होईल ते नंदनवन ।। ४ ।।

कृतज्ञताभावात अखंड राहूया ।
नारायणाची (टीप १) कृपा अनुभवूया ।। ५ ।।

टीप १ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले.

– सौ. ज्योती दाते (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ५९ वर्षे), रामनाथी आश्रम, गोवा. (७.९.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक