व्यावहारिक आणि पारमार्थिक जीवनात समर्पणभावाने साथ देणार्‍या पत्नीप्रती तिच्या वाढदिवसानिमित्त साधकाने व्यक्त केलेली कृतज्ञता !

‘श्रीकृष्ण जयंती (६.९.२०२३ या दिवशी) अमरावती येथील साधिका सौ. माया पिसोळकर यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांचे यजमान श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी त्यांच्या प्रती व्यक्त केलेली कृतज्ञता आणि त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी केलेली प्रार्थना येथे दिली आहे.

सौ. माया पिसोळकर

‘आमच्या विवाहानंतर माया पिसोळकर कुटुंबात आली आणि त्या कुटुंबियांशी पूर्णतः एकरूप झाली. तिने कधीच सासर-माहेर असा भेद केला नाही. तिच्या मनात दोन्ही कुटुंबांतील प्रत्येक सदस्याप्रती आपलेपणा आणि जिव्हाळा आहे.

श्री. श्रीकांत पिसोळकर

‘तिने मला माझे स्वभावदोष आणि अहं यांसह स्वीकारले अन् पावलोपावली कसे सांभाळले’, हे मी अनुभवले आहे. तिने माझ्याशी पूर्णतः एकरूप होऊन मला साधनेत साथ दिली. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले तिची साधना पूर्णत्वाला नेणारच आहेत’, याबद्दल माझ्या मनात यत्किंचितही शंका नाही. तिच्यातील समर्पणभावामुळे मला तिच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते.

तिच्या वाढदिवसाच्या दिवशी मी तिला शुभेच्छा देतो आणि गुरुचरणी प्रार्थना करतो, ‘तिची साधनेत लवकरात लवकर प्रगती होऊ दे.’

– श्री. श्रीकांत पिसोळकर, विदर्भ समन्वयक, हिंदु जनजागृती समिती (६.९.२०२३)