भाद्रपद कृष्ण द्वादशी (११.१०.२०२३) या दिवशी कु. गुलाबी दीपक धुरी हिचा २४ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिची बहीण कु. पूजा दीपक धुरी यांनी तिला दिलेल्या काव्यरूपी शुभेच्छा पुढे दिल्या आहेत.
जीवनाचा तुझा हा प्रवास साधनामय व्हावा ।
श्री गुरुचरणप्राप्तीचा ध्यास मनीचा सदैव वाढावा ।। १ ।।
करूनी प्रयत्नांची पराकाष्ठा, जिद्दीने पुढे चाल तू ।
अनावश्यक विचारांचा गुंता सोडवूनी, श्री चरणी लीन हो तू ।। २ ।।
गुरुकृपेने तुज लाभला ।
भूवैकुंठस्वरूप रामनाथी आश्रमातील निवास ।। ३ ।।
साधक आणि संत सहवासाचा लाभ तू करूनी घ्यावा ।
आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग मोकळा व्हावा ।। ४ ।।
साधनेतील अनंत अडचणींशी लढावूवृत्तीने लढायचे आहे तुला ।
ध्येय मोक्षप्राप्तीचे गाठायचे आहे तुला ।। ५ ।।
षड्रिपूंपासून सदा तुझे रक्षण व्हावे ।
श्री गुरुचरणी सर्वस्वाचे समर्पण व्हावे ।। ६ ।।
तीव्र साधना करूनी तू जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त व्हावे ।
साधनेत उत्तरोत्तर प्रगती करून तू लवकरच संतपद गाठावे ।। ७ ।।
– कु. पूजा दीपक धुरी (कु. गुलाबी धुरी यांची मोठी बहीण), कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (२४.९.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |