१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रथोत्सवाची ध्वनीचित्र-चकती पहातांना आलेल्या अनुभूती !
‘२१.६.२०२२ या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी आम्हाला सांगितले, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रथोत्सवाची ध्वनीचित्र-चकती (सी.डी.) पाहूया.’’
अ. ध्वनीचित्र-चकती पहात असतांना मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाले. त्या वेळी माझ्या भोवतालचे त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट झाल्याचे मला जाणवले.
आ. रथोत्सवाचे दृश्य पहात असतांना मला माझे अस्तित्व जाणवत नव्हते.
इ. ‘मी रथोत्सवात आणि नृत्यातही सहभागी आहे’, असे मला वाटले. तेथील वातावरण अलौकिक होते.
ई. मला जाणवले, ‘साक्षात् या भुवैकुंठामध्ये (रामनाथी आश्रमात) परात्पर गुरु डॉक्टरांनी श्रीविष्णूच्या विराट रूपात आणि श्रीचित्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी अनुक्रमे श्री महालक्ष्मीदेवी आणि श्री पद्मावतीदेवी यांच्या रूपात मला दर्शन दिले. माझ्या जन्माचे सार्थक झाले.’
२. डोके जड होऊन दुखणे आणि सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या सहस्रारावर लाल प्रकाश दिसल्यानंतर डोकेदुखीचा त्रास न्यून होऊन उत्साह वाटणे
२४.६.२०२२ या दिवशी सकाळपासूनच माझे डोके पुष्कळ जड होऊन दुखत होते. मला पुष्कळ झोप येत होती. तेव्हा सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या सहस्रारावर मला लाल प्रकाश दिसत होता. तो पाहिल्यावर सकाळपासून मला होणारा त्रास न्यून झाला आणि मला पुष्कळ हलके वाटून उत्साह जाणवू लागला.’
– सौ. शालिनी गोजे (वय ६५ वर्षे), नांदेड (२५.९.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |