…हा देशद्रोह आहे कि नाही ?

भारतात क्रिकेट विश्‍वकप सामने चालू होते. बेंगळुरूमधील चिन्‍नास्‍वामी स्‍टेडियमवर एकूण ५ सामने झाले. त्‍यापैकी या स्‍टेडियमवर एक सामना भारताचा न्‍यूझीलंडविरुद्ध झाला आणि पाकिस्‍तानचे २ सामने झाले. कर्नाटकचे मुख्‍यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सिद्धरामय्‍या यांनी केवळ पाकिस्‍तानच्‍या २ सामन्‍यांना उपस्‍थिती लावली होती. भारताचा सामना पहाण्‍यास ते उपस्‍थित राहिले नाहीत. केवळ पाकिस्‍तानच्‍या सामन्‍याला उपस्‍थिती लावणार्‍यांना देशभक्‍त म्‍हणतात का ? मुख्‍यमंत्री महाशय हे विसरले की, ‘मी भारतात रहातो’. त्‍यांनी भारताचा सामना असतांना उपस्‍थिती का नाही लावली ? सामनेच पहायचे होते, तर सर्व पाचही सामने पहायला पाहिजे होते. भारतामधील एका राज्‍याचा मुख्‍यमंत्री पाकिस्‍तान क्रिकेट संघाचा सामना पहाण्‍यास उपस्‍थित रहातो, मग भारतीय क्रिकेट संघाचा सामना पहाण्‍यास का येऊ शकत नाही ? हा देशद्रोह आहे कि नाही ?

श्री. प्रकाश शिंपी, पूर्व मंगळवार पेठ, सोलापूर.