‘आता प्रदूषण होत नाही का ?’ म्हणत मुंबईच्या समुद्रात मुसलमान कचरा टाकत असलेले छायाचित्र प्रसारित !

केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळी प्रदूषणाची आठवण होणारे प्रशासन आणि पोलीस यावर काय करणार ?

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – नुकत्याच झालेल्या दिवाळीमध्ये, तसेच त्यापूर्वी झालेल्या गणेशोत्सवात मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि राज्य सरकार यांकडून प्रदूषणमुक्त सण साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले होते. याचा संदर्भ देत एका व्यक्तीने मुंबईतील समुद्रात एक मुसलमान व्यक्ती मोठ्या प्रमाणात निर्माल्य टाकत असल्याचे छायाचित्र ‘एक्स’द्वारे प्रसारित केले आहे. या छायाचित्रासमवेत ‘आता प्रदूषण होत नाही का ?’ अशी विचारणाही या व्यक्तीने प्रशासनाला केली आहे. ही पोस्ट मुंबई पोलीस आणि मुंबई महानगरपालिका या दोघांना ‘मेंशन’ (उद्देशून) करून करण्यात आला आहे.