रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या ध्‍यानमंदिरात बसून नामजप आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना आत्‍मनिवेदन केल्‍यानंतर त्‍यांच्‍या छायाचित्रात पिवळा, गुलाबी आणि पांढरा शुभ्र रंग दिसणे

सौ. वृंदा मराठे

‘१७.१०.२०२२ या दिवशी सकाळी ११.३० वाजता मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील ध्‍यानमंदिरात बसून डोळे मिटून श्‍वासावर लक्ष केंद्रित करून नामजप करत होते. नंतर मी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना आत्‍मनिवेदन करू लागले. त्‍यानंतर मी ध्‍यानमंदिरात असलेल्‍या त्‍यांच्‍या छायाचित्राकडे पहात होते. मला एक ते दीड मिनिटांत ‘त्‍या छायाचित्रात रंग पालटत आहेत’, असे दिसू लागले. मला त्‍या छायाचित्रात एकामागून एक असे पिवळा, गुलाबी आणि पांढरा शुभ्र असे रंग दिसत होते. तेव्‍हा मला वाटले, ‘माझे आत्‍मनिवेदन देवापर्यंत पोचले’, याची देवाने मला प्रचीती दिली.’ मी सभोवती ‘वेगळा प्रकाश पडला आहे का ?’, असेही पाहिले; पण तसे काही नव्‍हते. ध्‍यानमंदिरातील सनातनच्‍या गुरुपरंपरेतील अन्‍य छायाचित्रांकडे पाहून मला तसे काही जाणवत नव्‍हते. मला वाटले ‘सूक्ष्म स्‍तरावर काहीतरी घडामोडी होत असतील.’

– सौ. वृंदा मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.१०.२०२२)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक