प्रीती तुझी कशी विसरू ।

सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१९.१०.२०२३ या दिवशी मी सेवा झाल्‍यावर खोलीत गेलो. तेव्‍हा मला सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले माझ्‍या जीवनात आले आणि त्‍यानंतर माझ्‍या जीवनात होत गेलेले पालट आठवू लागले. त्‍या वेळी त्‍यांनी माझ्‍यावर केलेली प्रीती आणि कृपा यांची जाणीव होऊन मला काव्‍यरूपी कृतज्ञतासुमन स्‍फुरले. ते येथे त्‍यांच्‍या चरणी अर्पण करत आहे.’

श्री. धैवत वाघमारे

प्रीती तुझी कशी विसरू । कृपेवीण दुजे का स्‍मरू ॥ धृ. ॥

जीवन माझे सुंदर लेणे । तव करुणेचे अवघे देणे ।
कर्तव्‍यासी कसा विसरू । प्रीती तुझी कशी विसरू ॥ १ ॥

नभात माझ्‍या सखा भगवंत । त्रिभुवनी गर्जे दया अनंत ।
वात्‍सल्‍यासी कसा विसरू । प्रीती तुझी कशी विसरू ॥ २ ॥

दावूनी ब्रह्म गाठी । सोडविली मोह गाठी ।
आनंदासी कसा विसरू । प्रीती तुझी कशी विसरू ॥ ३ ॥

मागता न ये काही । जाणशी तू सर्वकाही ।
चरणांसी कसा विसरू । प्रीती तुझी कशी विसरू ॥ ४ ॥

– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.१०.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक