उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. कान्हा संदीप कुलकर्णी हा या पिढीतील एक आहे !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
‘वर्ष २०२१ मध्ये ‘चि. कान्हा संदीप कुलकर्णी उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आला असून त्याची आध्यात्मिक पातळी ५५ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२३ मध्ये त्याची आध्यात्मिक पातळी ५७ टक्के झाली आहे. त्याच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, त्याची साधनेची तळमळ आणि त्याच्यातील भाव यांमुळे आता त्याची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (६.११.२०२३) |
१. आरंभी मी सेवा करत असतांना तो रडणे, न ऐकणे, एका जागी न बसणे, असे करत असे. आता तो शांत बसतो. मी सांगेन, ते तो ऐकतो.
२. तो प्रतिदिन संध्याकाळी स्तोत्र म्हणतो. घरातील मोठ्यांना नमस्कार करतो. मी श्रीकृष्णाच्या छायाचित्रासमोर साष्टांग नमस्कार करते. ते पाहून तोही माझ्याप्रमाणे नमस्कार करतो.
३. तो हात जोडून ‘हे श्रीकृष्णा, मला काही नको. मला केवळ तू हवा आहेस’, अशी श्रीकृष्णाला प्रार्थना करतो. तेव्हा ‘लहान वयातच गुरुदेव त्याच्याकडून साधना करून घेत आहेत’, हे पाहून मला गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटते.
४. आध्यात्मिक उपायांचे महत्त्व जाणणे
अ. मी माझ्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण काढत असतांना तोही माझ्यासह आवरण काढायला बसतो. त्या वेळी ‘‘मी योग्य करतो आहे ना ?’’ असे तो विचारून घेतो.
आ. आमच्याकडे सप्ताहातून दोन दिवस नामजपादी उपाय सत्संग असतात. या उपाय सत्संगांना पुणे, सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतील साधक ‘ऑनलाईन’ जोडलेले असतात. यात स्तोत्रपठण, मानसशुद्धी इ. उपाय घेतले जातात. त्या वेळी तो माझ्यासमवेत उपाय सत्संगाला बसतो.’
– सौ. सई संदीप कुलकर्णी (चि. कान्हाची आई) भोसरी, पुणे.
८. ‘कान्हाशी बोलतांना मला आनंद अनुभवता येतो. तसेच त्याच्याशी बोलल्यावर ‘माझ्यावर आलेले त्रासदायक शक्तीचे आवरण दूर होते’, असे जाणवते.’ – सौ. रिमा गणेश देशपांडे (चि. कान्हाची मावशी), चिंचवड, पुणे.
९. स्वभावदोष : हट्टीपणा’
– सौ. सई संदीप कुलकर्णी (चि. कान्हाची आई) भोसरी, पुणे.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |