
जेजुरी (पुणे) – राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीमध्ये १३ नोव्हेंबरला सोमवती यात्रेनिमित्त सहस्रो भाविक दर्शनासाठी आले होते. सकाळी ७ वाजता देवाच्या उत्सवमूर्तींच्या पालखी सोहळ्याने कर्हा स्नानासाठी प्रस्थान केले. या वेळी भंडार खोबर्याच्या उधळणीत सदानंदाचा जयघोष करण्यात आला. बंदुकीच्या फैरी झाडून सोहळ्याला सलामी देण्यात आली. १३ नोव्हेंबरला दुपारपर्यंत अमावास्येचा पर्वकाळ असल्याने परिसरात सकाळीच सोमवती यात्रा भरली होती. खंडेरायाचे मानकरी पेशवे, खोमणे, माळवदकर आदींनी पारंपरिक विधी केल्यानंतर खांदेकरी मानकर्यांनी उत्सवमूर्तींची पालखी उचलली. मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून पालखी बालदारीत आणण्यात आली. देवाच्या पुजारी सेवकांनी उत्सवमूर्ती पालखीत ठेवल्यानंतर सोहळ्याने गडकोटाबाहेर प्रस्थान केले. दिवाळी सण, लक्ष्मीपूजन आणि सकाळीच सोहळ्याचे प्रस्थान राहिल्याने सोहळ्यात भाविकांची गर्दी अल्प होती. सोमवती यात्रेचे नियमित वारकरी, ग्रामस्थ मंडळी हे सोहळ्यात उपस्थित होते.
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !
बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद या नरविरांचे स्मरण करण्यासाठी ३० जुलैला ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन !