वडिलांच्या साहाय्याने केले धर्मांतर !
चित्रदुर्ग (कर्नाटक) – कर्नाटकमध्ये धर्मांतरविरोधी कायद्याच्या अंतर्गत पहिल्यांदाच एका अल्पवयीन मुलीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी तिच्या वडिलांवरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यातील १७ वर्षीय पीडित विद्यार्थी तिच्या वर्गात शिकत होता. त्याचा बुद्धीभेद करून या मुलीने तिच्या वडिलांच्या साहाय्याने त्याला मुसलमान बनवले होते. याची पीडित विद्यार्थ्याच्या पालकांना माहिती नव्हती. त्याच्या दप्तरामध्ये गोल टोपी आणि इस्लामी साहित्य मिळाल्यावर त्यांना संशय आला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. अद्याप या प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
पीडित मुलाने घरामध्ये पूजा आणि प्रार्थना करणे बंद केले होते, तसेच त्याने दसर्याच्या पूजेला उपस्थित रहाण्यास नकार दिला होता. यामुळे पालकांना संशय आला आणि त्यांनी त्याच्या दप्तराची तपासणी केली. तेव्हा त्यात गोल टोपी आणि इस्लामी साहित्य सापडले. त्याच्या भ्रमणभाषमध्ये अमली पदार्थांविषयीची माहिती मिळाली. पीडित मुलाच्या वडिलांनी सांगितले की, अल्पवयीन मुलगी आमच्या मुलाला तिच्या वडिलासमवेत मशिदीत घेऊन जात होती. तेथेच माझ्या मुलाचे त्याच्या अनुमतीविना धर्मांतर करण्यात आले.
संपादकीय भूमिकाहिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने त्यांचे ख्रिस्ती आणि मुसलमान बुद्धीभेद करून किंवा आमीष दाखवून धर्मांतर करतात, हे लक्षात घ्या ! |