चेन्नई (तमिळनाडू) – चेन्नई पोलिसांनी शहरातील ईस्ट कोस्टा या भागातील एका सदनिकेत करण्यात येत असलेली ‘वाईफ स्वॅपिंग’ पार्टी उघळून लावत सेंथिल कुमार, चंद्रमोहन, कुमार, शंकर, वेलराज, पेरासन्, सेल्वन् आणि व्यंकटेशकुमार या ८ जणांना अटक केली. यासह ३० ते ४० या वयोगटांतील महिलांचीही सुटका करण्यात आली. या महिला विवाहित असून त्यांना पैशांचे आमिष दाखवले गेल्याचा संशय आहे. या पार्टीच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणारे एक जाळे पोलिसांनी उद्ध्वस्त केले. या पार्टीविषयी शेजार्यांनी पोलिसांना दूरभाष करून माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी येथे धाड घातली. येथे पोलिसांना मोठ्या प्रमाणावर पुरुष आढळले. घरात गाणी लावण्यात आली होती आणि मद्यही दिले जात होते.
अटक करण्यात आलेले आरोपी अविवाहित तरुणांना हेरत असत आणि त्यांची काही महिलांशी ओळख करून देत असत. त्यांनी ‘वाईफ स्वॅपिंग’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवण्यासाठी सामाजिक माध्यमावर एक पानही बनवले होते. त्या माध्यमातून हे वेश्याव्यवसाय चालवत होते. पुरुषांकडून १३ ते २५ सहस्र रुपयांची मागणी केली जात असे. त्यानंतर पुरुषांना महिलांची ओळख करून दिली जात असे. एका महिलेच्या जाळ्यात तो पुरुष अडकला की, त्याला इतर महिलांचे आमिषही दाखवले जात असे.
‘वाइफ स्वॅपिंग’ म्हणजे काय ?
‘वाइफ स्वॅपिंग’ म्हणजे पत्नींची देवाणघेवाण. शारीरिक संबंधांसाठी विवाहित पुरुष एका रात्रीसाठी दुसर्याच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवतात आणि स्वतःच्या पत्नीला त्या महिलेच्या पतीकडे पाठवतात.
संपादकीय भूमिकापाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणारे भारतीय किती खालच्या स्तरावर जात आहेत, हेच यातून लक्षात येते ! समाजाची नैतिकता प्रतिदिन अधिकाधिक रसातळाला जात आहे. ही स्थिती समाजाच्या विनाशाला कारणीभूत ठरली, तर आश्चर्य वाटू नये ! |