केंद्रशासनाकडून ‘महादेव बेटिंग अ‍ॅप’सह २२ अ‍ॅप आणि संकेतस्थळे यांवर बंदी

रायपूर (छत्तीसगड) – अंमलबजावणी संचालनालयाच्या (‘ईडी’च्या) शिफारसीनुसार इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ‘महादेव बेटिंग अ‍ॅप’सह २२ बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप्स आणि संकेतस्थळे यांवर बंदी घालण्याचा आदेश दिला. महादेव अ‍ॅपच्या मालकाकडून छत्तीसगडचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना ५०८ कोटी रुपये देण्यात आल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे.

सौजन्य द एकॉनॉमिक टाइम्स 

केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री म्हणाले की, छत्तीसगड सरकारला आयटी कायद्याच्या कलम ६९ अ अंतर्गत संकेतस्थळ आणि अ‍ॅप बंद करण्याची शिफारस करण्याचा पूर्ण अधिकार आहे; मात्र त्यांनी तसे केले नाही. सरकार गेल्या दीड वर्षांपासून याची चौकशी करत आहे. खरे तर ईडीकडून ही पहिली आणि एकमेव विनंती आहे जी प्राप्त झाली आणि त्यावर प्रक्रिया केली गेली. छत्तीसगड सरकारला अशी विनंती करण्यापासून कुणीही रोखले नव्हते.