जन्माला साधनेसाठी आला आहेस, थोडे प्रयत्न करून बघ ।
मार्ग पुष्कळ खडतर आहे, थोडे धाडस तर करून बघ ॥ १ ॥
थोड्याशा अडचणीने कोसळून जाऊ नकोस ।
गुरुदेवांचे बोट धरून यशाची वाट चालून बघ ॥ २ ॥
अपयश आले, तर त्यातून शिकून बघ ।
अरे, कर नवीन सुरुवात, थोडे शरण जाऊन बघ ॥ ३ ॥
बोलण पुष्कळ सोपं आहे, केवळ कृती करून बघ ।
गुरुचरण हवे असतील, तर जरा संघर्ष करून बघ ॥ ४ ॥
जीवन एक कोडे आहे ।
जगता जगता माया सोडून साधना तर करून बघ ॥ ५ ॥
– कु. प्रियांका शिंदे, नाशिक (१४.९.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |