पणजी, ३० ऑक्टोबर (वार्ता.) – नवीन पर्यटक हंगामाला प्रारंभ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोव्यात विविध समुद्रकिनार्यांवर ‘ऑनलाईन रिअल टाईम’ ध्वनी देखरेख यंत्रणा बसवली आहे. उत्तर गोव्यात मोरजी, आश्वे, मांद्रे, हरमल, कांदोळी, कळंगुट, बागा आणि हणजूण, तसेच दक्षिण गोव्यात कोलवा, केळशी, बाणावली आणि आगोंद समुद्रकिनारा मिळून एकूण १२ ठिकाणी ही यंत्रणा बसवण्यात आली आहे.
गोवा समुद्रकिनारपट्टी विभागीय व्यवस्थापन प्राधिकरणाने मोरजी आणि मांद्रे हे समुद्रकिनारे ‘सायलंट झोन’ म्हणून अधिसूचित केले आहेत आणि या ठिकाणी समुद्रकिनार्यांवर पार्टी करण्यास पूर्णपणे बंदी आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्य कार्यालयातून या सर्व १२ ठिकाणांच्या ध्वनीप्रदूषणावर देखरेख ठेवली जाणार आहे. ही यंत्रणा प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबरच पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांनाही जोडण्यात आलेली आहे. या ठिकाणी २४ घंटे आणि ३६५ दिवस ध्वनी नोंद केला जाणार आहे. ध्वनीप्रदूषण झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर त्वरित कारवाई केली जाणार आहे. युरोपियन संघ आणि अमेरिकेची पर्यावरण संरक्षण संस्था यांच्या नियमांचे पालन करणारी यंत्रणा या ठिकाणी बसवण्यात आली आहे. नियमानुसार बाजाराच्या ठिकाणी दिवसा ६६ डिबी आणि रात्री ५५ डिबी, निवासी क्षेत्राच्या ठिकाणी दिवसा ५५ डिबी आणि रात्री ४५ डिबी ध्वनीमर्यादा आहे.
संपादकीय भूमिकायंत्रणा कितीही अत्याधुनिक बसवली, तरी दोषींवर कारवाई करण्याची प्रशासनाची इच्छाशक्ती हवी ! |
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक