राजकारणाकडे राष्ट्रसेवेचे व्रत म्हणून पहाणारे भारताचे पहिले राष्ट्र्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद !

भारताचे पहिले राष्ट्र्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद

भारताचे पहिले राष्ट्र्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी व्यवसाय केला नाही; पण ते विधी विशारद होते. ते त्यांच्या काळातील एक तेजस्वी आणि आदर्श विद्यार्थी होते. त्यांच्या उत्तरपत्रिका पडताळणार्‍या परीक्षकाने उत्तरपत्रिकांवर ‘परीक्षार्थी परीक्षकांपेक्षाही सुबुद्ध (हुशार) आहे’, असा अभिप्राय (रिमार्क) लिहिला होता. राजेंद्रप्रसाद यांनी मनात आणले असते, तर कुठल्याही क्षेत्रात फार मोठे कार्य करू शकत होते; परंतु त्यांनी राष्ट्रसेवेच्या प्रेरणेने भारावून राजकारणात प्रवेश केला. दुसरा कुठला मार्ग नव्हता; म्हणून ते राजकारणाकडे वळले नव्हते. त्यांनी करायचेच ठरवले असते, तर ते काहीही करू शकले असते आणि वैभवात लोळले असते. तशा अनेक संधी असतानांही सर्व लाथाडून ते राजकारणात आले; परंतु त्यांच्या दृष्टीने राजकारण हे राष्ट्रसेवेचे व्रत होते, इतरांसारखा धंदा नव्हता.

– अधिवक्ता सुभाष झा, सर्वाेच्च न्यायालय, मुंबई.