कुर्ला (मुंबई) – येथे फटाकेविक्री करणार्या एका दुकानात इराकचा माजी हुकूमशहा सद्दाम हुसैन याचे छायाचित्र असलेले फटाके विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध अजूनही थांबलेले नाही. भारताने हमासने केलेल्या आतंकवादी कृत्याचा निषेध केला आहे; मात्र तरीही भारतातील काही मुसलमान संघटना, पुरोगामी आणि निधर्मी पक्ष हे हमास आणि पॅलेस्टिनी यांच्या समर्थनार्थ देशभर आंदोलने करत आहेत. सामाजिक संकेतस्थळांवर इस्रायल आणि त्याला समर्थन देणार्या भारताच्या भूमिकेच्या विरोधात लिखाण करत आहेत. या युद्धात इराकमधील आतंकवादी नेत्यांनीही हमासच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. अमेरिकेने इस्रायलला साहाय्य करू नये, यासाठी या नेत्यांकडून अमेरिकेवर दबाव आणला जात आहे. या पार्श्वभूमीवर ‘इराकच्या माजी हुकूमशहाच्या नावाने फटाके विकणे म्हणजे आतंकवादी हमासचे खुले समर्थन करणेच आहे’, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
कोण आहे सद्दाम हुसेन ?
इराकचा माजी हुकूमशहा सद्दाम हुसेन याने सत्तेवर असतांना वर्ष १९८२ मध्ये त्याच्या हत्येचा कट रचल्याच्या संशयावरून इराकमधील दुजेल शहरात प्रचंड नरसंहार घडवला. यामध्ये १४८ नागरिक मारले गेले. या नागरिकांच्या हत्येचा ठपका ठेवून अमेरिकेने त्याच्या विरोधात खटला चालवला. ५ नोव्हेंबर २००६ या दिवशी त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. ३० डिसेंबर २००६ या दिवशी त्याला फासावर लटकवण्यात आले होते.
संपादकीय भूमिका
|