‘हिंदु धर्म’ हा विश्वातील सर्वाेत्कृष्ट धर्म असून तो ‘जगद्गुरु’ पदावर आरूढ आहे. आज या तेजस्वी धर्माला अज्ञान आणि अधर्म यांचे ग्रहण लागले आहे. ज्या धर्माने संपूर्ण विश्वाला अंधःकारातून प्रकाशाकडे नेले, त्या स्वयंप्रकाशी धर्माला नष्ट करण्यासाठी सहस्रावधी आघात केले जात आहेत. हे आघात करणार्यांमध्ये कधी ख्रिस्ती, धर्मांध मुसलमान, तर कधी साम्यवादी अन् मार्क्सवादी असे अधर्मी असतात. कालची आणि आजची या दोन्ही पिढ्या केवळ भोगवादात रमल्या आहेत. ना त्यांच्यात राष्ट्रप्रेम आहे, ना धर्मप्रेम ! त्यांना प्रसारमाध्यमांनी उद्ध्वस्त केले आहे. हे असेच चालू राहिले, तर येणार्या पिढ्यांचे भविष्य अंधःकारमय असेल. जर हिंदु धर्मच नष्ट झाला, तर भारतात उरलेच काय ? उरेल तो केवळ एक भौगोलिक सांगाडा ! हिंदूंना या संकटापासून रक्षण करण्याचा विचार करावा लागेल. – श्री. विनोदकुमार सर्वाेदय, उत्तरप्रदेश (जून २०१३)