सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी आजन्म शरणागत आणि कृतज्ञताभावात रहायला हवे !

आश्रमातील संत आणि सहसाधक यांच्या समवेत अनौपचारिक बोलतांना साधनेविषयी शिकायला मिळालेले प्रेरणादायी सूत्र !

पू. शिवाजी वटकर

 

‘देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात महाप्रसादाच्या वेळी संत आणि सहसाधक यांच्या समवेत साधनेविषयी अनौपचारिक बोलतांना मला पुष्कळ शिकायला मिळते. त्यातून मला साधना आणि सेवा करण्यास प्रेरणा मिळते.

‘काही साधक म्हणतात, ‘‘पू. वटकरकाका मायेतील गोष्टींचा त्याग करून आश्रमात राहून साधना करतात.’’ मलाही असेच वाटत होते, ‘माझा मुंबईतील बंगला, गाडी, मुले, नातवंडे आणि प्रतिष्ठा इत्यादी सोडून मी सनातन संस्था अन् आश्रम येथे साधना करण्यासाठी आलो आहे’; पण हा एक गोड अपसमज आणि तीव्र अहं होता. प्रत्यक्षात मी माझ्या स्वार्थासाठी सनातन संस्थेत आलो आहे. मला पैसा, ऐश्वर्य किंवा मानसन्मान यांतून आनंद मिळत नव्हता. मला अनंत दुःखे आणि समस्या होत्या. ‘यांतून मला केवळ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले सोडवू शकतात’, हे मला त्यांच्या कृपेने कळले. ‘त्यांनी मला सनातन संस्था आणि आश्रम येथे आश्रय दिला आहे’, हेच त्रिवार सत्य आहे. त्यासाठी मला सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या चरणी आजन्म शरणागत आणि कृतज्ञताभावात रहायला पाहिजे.’

– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे समष्टी संत, वय ७६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.१२.२०२२)