
अक्कलकोट (जिल्हा सोलापूर), २५ ऑक्टोबर (वार्ता.) – महाराष्ट्र राज्य प्रादेशिक पर्यटन विकास योजनेच्या अंतर्गत तीर्थक्षेत्र अक्कलकोटचे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन देवस्थानच्या जीर्णोद्धाराच्या विविध कामांचा शुभारंभ भाजपचे आमदार श्री. सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी म.नि.प्र. बसवलिंग महास्वामीजी यांची वंदनीय उपस्थिती होती. या वेळी आमदार श्री. कल्याणशेट्टी म्हणाले, ‘‘राजसत्तेसमवेत धर्मसत्ता टिकवणे आवश्यक आहे. श्री मल्लिकार्जुन देवस्थान हे संस्थानकालीन मंदिर असून सहस्रो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. प्रतिवर्षी यात्रा आणि रथोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो, त्यामुळे मंदिराचा कायापालट करण्यासाठी आपल्या सर्वांना मिळून काम करायचे आहे.’’ या वेळी मंदिराचे विश्वस्त श्री. महेश हिंडोळे यांनी शासनाचा वेळोवेळी पाठपुरावा करून २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याविषयी आमदार कल्याणशेट्टी यांचे आभार मानले.
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !
बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद या नरविरांचे स्मरण करण्यासाठी ३० जुलैला ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
उद्योगाच्या यशासाठी अध्यात्माची जोड आणि साधनेची आवश्यकता अनिवार्य ! – डॉ. रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी उद्योगसमूह