पुणे – नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात टोळक्याने महिलेसह दोघांवर कोयत्याने वार करून दहशत निर्माण केली. जनता वसाहतीत ही घटना घडली. या प्रकरणी चेतन पवार यांनी पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. त्यानुसार पोलिसांनी मिलिंद कवडे, शुभम मोरे आणि संकेत घाणेकर यांना अटक केली आहे. यासह २ अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.