शरद ऋतूमध्ये नेहमीपेक्षा दोन घास न्यून जेवावे

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २४५

‘ऑक्टोबर मासात, म्हणजेच शरद ऋतूच्या आरंभीच्या काळात रोगांचे प्रमाण वाढते’, हे आपण आधी पाहिलेच आहे. वात, पित्त आणि कफ यांच्यामध्ये असंतुलन निर्माण झाले की, रोग होतात. हे असंतुलन निर्माण होण्याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे ‘अती प्रमाणात जेवणे’. नवरात्र आणि त्यानंतर येणारा दसरा या सणांच्या काळामध्ये घरामध्ये चांगले चांगले अन्नपदार्थ बनवले जातात. अशा वेळी हे पदार्थ थोडीशी भूक शिल्लक ठेवून खावेत. पदार्थ आवडला म्हणून पोटभर खाणे टाळावे. एकूणच शरद ऋतूमध्ये नेहमीपेक्षा दोन घास न्यून जेवावे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.१०.२०२३)