
कोल्हापूर – कोल्हापूर येथे हिंदु एकता आंदोलनाच्या कार्यालयामध्ये झालेल्या प्रदेशाच्या बैठकीमध्ये हिंदु एकता आंदोलनाच्या प्रदेशाध्यक्षपदी हिंदु धर्मरक्षक, ‘नरवीर’ पुरस्कारप्राप्त माजी आमदार नितीन शिंदे यांची निवड करण्यात आली. या बैठकीसाठी सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक, धुळे, शिर्डी, श्रीरामपूर, पुणे या जिल्ह्यांतील हिंदु एकता आंदोलनाचे प्रमुख जिल्हाध्यक्ष, सध्याचे प्रदेशाध्यक्ष हिरामण आप्पा गवळी उपस्थित होते. या संदर्भात रविवार, २२ ऑक्टोबरला दैवज्ञ भवन, कोल्हापूर रोड, सांगली येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात निवडीचे पत्र देण्यात येणार आहे. या प्रसंगी त्यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे.
तरी सांगली जिल्ह्यातील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते, शिवभक्त यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. विष्णुपंत पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष श्री. संजय जाधव यांनी केले आहे.
अभिजीत दीपके याच्याशी बोलून आंदोलनाची दिशा ठरवणार ! – उद्धव ठाकरे
देशातील लोकशाहीने कात टाकली आहे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
पत्रकार आदित्य गोरेगावकर यांच्यावर जीवघेणे आक्रमण
गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता !
मालाड (मुंबई) येथे जगन्नाथ रथयात्रेला मूळ मार्गाने नेण्यास मुंबई उच्च न्यायालयाची अनुमती
पंढरपूर कॉरिडॉरचे काम कुणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री