नवी देहली – ‘गूगल’ या आंतरराष्ट्रीय आस्थापनाचे उपाध्यक्ष रिक ओस्टरलोह यांनी घोषणा केली आहे की, त्यांच्या आस्थपनाचा ‘पिक्सेल ८’ या स्मार्टफोनचे उत्पादन भारतात करण्यात येईल. यापूर्वी अॅपल आणि सॅमसंग या आंतरराष्ट्रीय आस्थापनांनी त्यांचे स्मार्टफोन भारतात बनवण्यास प्रारंभ केला आहे. ‘पिक्सेल ८’ हा स्मार्टफोन गूगलने यापूर्वीच बाजारात आणला आहे. याची किंमत ७६ सहस्र रुपये आहे.
सौजन्य बिसनेस टूडे
रिक ओस्टरलोह म्हणाले की, भारतात बनवलेला पहिला ‘पिक्सेल ८’ र्स्माटफोन वर्ष २०२४ मध्ये बाजारात येईल. यासाठी गूगल भारतात त्याचे हार्डवेअर बनवण्यासाठी भागीदारांचे साहाय्य घेणार आहे. यासाठी काही आस्थापनांशी चर्चा चालू आहे.