शरद ऋतूमध्ये आरोग्यासंबंधीचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २४४

‘पावसाळा संपल्यानंतर आणि हिवाळा चालू होण्यापूर्वीचा काळ म्हणजे ‘शरद ऋतू’. पावसाळ्याचे साधारण ३ – ४ मास आपल्या शरिराला पावसाच्या गारव्याची सवय झालेली असते. शरद ऋतूच्या आरंभी एकाएकी पाऊस निघून जाऊन कडक ऊन पडू लागते. वातावरणात एकाएकी झालेले हे पालट बहुतेक वेळा शरीर सहन करू शकत नाही. त्यामुळे अन्य ऋतूंपेक्षा शरद ऋतूमध्ये माणसे आजारी पडण्याचे प्रमाण जास्त असते.

वैद्य मेघराज पराडकर

‘शरद ऋतू ही वैद्यांचे पालन पोषण करणारी आई आहे’, अशा अर्थाचे जे एक सुभाषित आहे, ते यामुळेच. या ऋतूमध्ये नेहमीपेक्षा अधिक काटेकोरपणे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असते.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.१०.२०२३)