‘ऑनड्युटी’ ‘ऑनलाईन गेम’ खेळण्याचे प्रकरण
मुंबई – ‘ड्रीम इलेव्हन’ हा ‘ऑनलाईन गेम’ खेळून दीड कोटी रुपये कमावणारे पिंपरी-चिंचवड येथील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांच्यावर पोलीस खात्याची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
१. ऑनलाईन गेम खेळून पारितोषिक मिळवणारे सोमनाथ झेंडे यांनी माध्यमांना याविषयी गणवेशामध्ये मुलाखत दिली. त्यानंतर हा प्रकार उघड झाला. मंत्रालय आणि विधीमंडळ यांमध्ये शासकीय कर्मचारी अन् पहार्यावर असलेले पोलीस कामावर असतांना ऑनलाईन जुगार खेळत असल्याचे दिसून येते. ‘त्यांच्यावर कारवाई कधी होणार ?’ असा प्रश्न उपस्थित होत आहे.
२. विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या काळातही पहारा देणारे पोलीस भ्रमणभाषवर अधिक वेळ घालवत असल्याचा प्रकार पोलीस अधिकार्यांच्या लक्षात आला आहे. विधीमंडळाच्या कालावधीत परिसरात लावण्यात आलेल्या ‘सीसीटीव्ही’च्या माध्यमातून पहारा देणारे पोलीस भ्रमणभाषवर अधिक वेळ घालवत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची चेतावणी देण्यात आली होती.
शासकीय कर्मचारी ‘ऑनड्युटी’ ऑनलाईन गेम खेळत असल्याचे दैनिक ‘सनातन प्रभात’मधून यापूर्वीच उघड !दैनिक ‘सनातन प्रभात’ने ७ मार्च २०२३ या दिवशी पृष्ठ क्रमांक १ वर ‘जंगली रमी’ या ऑनलाईन जुगारात महाराष्ट्रासह देशभरात वाढ’ या मथळ्याचे ठळक वृत्त प्रसिद्ध केले होते. यामध्ये मंत्रालयासह शासकीय कार्यालयांमध्येही कामावर असतांनाही ऑनलाईन जुगार खेळला जात असल्याचे नमूद केले आहे. |
संपादकीय भूमिका
|