भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये प्रेक्षकांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना पोटशूळ !
कर्णावती (गुजरात) – येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये १४ ऑक्टोबरला झालेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्याच्या वेळी दर्शकांकडून ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या होत्या. या सामन्यात भारत विजयी झाला होता. ‘जय श्रीराम’च्या घोषणांवरून तमिळनाडूचे द्रविड (द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड प्रगती संघ) सरकारचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी टीका केली आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटले की, भारत खिलाडूवृत्ती आणि आदरातिथ्य यांसाठी प्रसिद्ध आहे; मात्र कर्णावती येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंसमवेत करण्यात आलेली वागणूक स्वीकाहार्य नाही. ती अत्यंत खालच्या दर्जाची आहे. खेळ दोन्ही देशांना संघटित करणारी शक्ती बनली पाहिजे. तसेच खर्या बंधूभावानेला प्रोत्साहन दिले पाहिजे. खेळाचा द्वेष पसरवणार्या शस्त्राप्रमाणे वापर करणे निंदनीय आहे. (भारताशी खेळतांना धर्मयुद्धाप्रमाणे खेळणार्या पाकिस्तानी क्रिकेटपटूंना स्टॅलिन असा सल्ला का देत नाहीत ? – संपादक)
उदयनिधी स्टॅलिन या वेळी गप्प का बसले ?
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेसमवेतच्या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवल्यावर रिझवान या खेळाडूने मैदानावर नमाजपठण केले होते. एरव्हीही पाकिस्तानी खेळाडू असे करत असतात. तसेच रिझवान याने हा विजय गाझा पट्टीतील मुसलमानांना समर्पित केला होता. (रिझवान याच्या या कृत्यांचा खेळाशी काय संबंध ?, असा प्रश्न उदयनिधी स्टॅलिन यांनी का विचारला नाही ? – संपादक)
इस्रायलच्या भारतातील राजदूताने पाकिस्तानवर केली टीका !
इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलोन यांनी भारताने पाकिस्तानला पराजित केल्यावर ट्वीट करून म्हटले, ‘भारताच्या विजयामुळे आम्ही आनंदी आहोत आणि पाकिस्तानी संघ त्यांचा विजय हमासच्या आतंकवाद्यांना समर्पित करू शकला नाही.’ (इस्रालयच्या राजदूताला जे वाटते, त्याविषयी स्टॅलिन बोलतील का ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|