उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. आराध्या विक्रम बेगेरी ही या पिढीतील एक आहे !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
‘बेंगळुरू येथील कु. आराध्या विक्रम बेगेरी (वय १ वर्ष ३ मास) हिच्या आजीला (आईची आई) तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. जन्मापूर्वी
अ. ‘गर्भारपणाच्या काळात कु. आराध्याची आई (सौ. श्रद्धा विक्रम बेगेरी) आणि वडील (श्री. विक्रम बेगेरी) हे दोघेही रामरक्षा स्तोत्र आणि अथर्वशीर्ष म्हणायचे अन् देवाची आरती करायचे.
आ. आराध्याच्या आईला (सौ. श्रद्धा) गर्भधारणा झाली. तेव्हा तिला पुष्कळ त्रास व्हायचा. त्या वेळी ती प्रतिदिन श्रीमद़्भगवद़्गीतेचे वाचन करत असे.
इ. आधुनिक वैद्यांकडे तपासणीसाठी गेल्यावर ते म्हणाले, ‘‘बाळ शांत आहे आणि लगेच प्रतिसाद देत आहे.’’
ई. ५ ते ९ व्या मासांपर्यंत आराध्याची आई श्रीकृष्णाचा नामजप करत असे.
२. जन्मानंतर
२ अ. भावजागृतीचे प्रयोग केल्यावर आराध्याला झोप लागणे : जन्मानंतर २ मास आराध्या रात्री झोपायची नाही. तेव्हा मी तिला घेऊन भावजागृतीचे प्रयोग करायचे. तिला सनातनच्या तिन्ही गुरूंची स्तुती सांगायचे, उदा. आराध्या आश्रमात आहे. गुरुमाऊलीची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) ती पाद्यपूजा करत आहे. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या खोलीत आराध्या सेवा करत आहे. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या खोलीत कु. आराध्या बसलेली आहे. अशी स्तुती सांगितल्यावर ती लगेच झोपी जायची.
२ आ. सात्त्विकतेची आवड असणे : तिला देवाविषयी ओढ वाटते. तिला देवतांची चित्रे दाखवल्यावर देव ओळखीचे वाटतात. तिला गणपति अधिक आवडतो. देवतांना पाहिल्यावर ती लगेच हात जोडून नमस्कार करते आणि तिच्या शब्दांत काहीतरी बोलते.
२ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राला नमस्कार करणे : आराध्या झोपते तिथे ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ आहे. ती त्या ग्रंथाला पाहून हात जोडून नमस्कार करते. प.पू. गुरुदेवांचे छायाचित्र पाहिल्यावर हसून नमस्कार करते.
३. आराध्याचे स्वभावदोष
राग येणे आणि हट्टीपणा.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांंनी माझ्याकडून हे २ शब्द लिहून घेतल्याबद्दल कोटीश: कृतज्ञ आहे.’
– सौ. शीला लक्ष्मण मांद्रेकर (कु. आराध्याची आजी (आईची आई) म्हापसा, गोवा. (२८.५.२०२३)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |