‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केल्‍यानंतर वडिलांचे मद्याचे व्‍यसन सुटणे

‘श्री गुरुदेव दत्त’ नामजप (प्रतिकात्मक चित्र)
श्री. भूषण पाटील

‘माझे बाबा (श्री. रूबाब पाटील) पूर्वी पुष्‍कळ मद्यपान करायचे. एकदा मला श्री. अमोल वानखडे यांनी ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करायला सांगितला. त्‍याआधी मी कधी नामजप करत नव्‍हतो. तेव्‍हा मी आणि माझी आई (सौ. सुनिता पाटील) ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करू लागलो. काही कालावधीनंतर आम्‍ही करत असलेल्‍या नामजपामुळे माझे बाबा मद्यपान करायचे पूर्ण बंद झाले. गुरुदेव (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), हे सर्वकाही तुमच्‍यामुळे शक्‍य झाले. त्‍यामुळे मी तुमच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

– श्री. भूषण रूबाब पाटील (वय २० वर्षे), नंदुरबार (२.८.२०२२)