मॉस्को – हमास-इस्रायल युद्धाला अमेरिका उत्तरदायी असल्याचा आरोप रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केला. इस्रायल आणि गाझा पट्टी यांच्यातील संघर्ष अमेरिकेच्या मध्य पूर्व धोरणाचे अपयश दर्शवतो. स्वतंत्र सार्वभौम पॅलेस्टाईनची निर्मिती आवश्यक आहे, असे पुतिन यांनी म्हटले आहे.
ब्रिटनचा इस्रायलला पाठिंबा
इस्रायलला पाश्चात्त्य देशांकडून पाठिंबा मिळत आहे. आता ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी इस्रायलला पाठिंबा दिला आहे. ब्रिटनसह अमेरिका,फ्रान्स, जर्मनी आणि इटली या देशांच्या नेत्यांनी प्रसिद्ध केलेल्या एका संयुक्त निवेदनात हमासच्या कृतीचा निषेध केला आहे.