पाटलीपुत्र (बिहार) – बिहारमध्ये अपघातामध्ये मृत झालेल्या एका व्यक्तीचा मृतदेह पोलिसांनी पुलावरून थेट खाली ओढ्यात फेकून दिल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला. या वेळी हे दृश्य स्थानिक नागरिक शांतपणे बघत असल्याचेही यात दिसत आहे. (चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याचे नागरिकांचे धाडस नसणे, हे सर्वांत मोठी लोकशाही असणार्या देशाला लज्जास्पद आहे ! – संपादक) ८ ऑक्टोबर या दिवशी बिहारमधील मुझफ्फरपूर येथील फाकुली ओपी भागात ही घटना घडली. या संदर्भात पोलिसांनी प्रसारित केलेल्या निवेदनानुसार, मृतदेहाचे काही भाग आणि कपडे एकात-एक अडकले होते. ते काढणे अशक्य झाल्यामुळे ते बाजूच्या ओढ्यात फेकून देण्यात आले. (या ठिकाणी एका पोलिसाचा किंवा एखाद्या नेत्याचा अपघात झाला असता, तर पोलिसांनी असेच कृत्य केले असते का ?- संपादक)
ना पंचनामा, ना पोस्टमार्टम…; एक्सीडेंट में मरे शख्स की लाश को नहर में फेंका, बिहार पुलिस की शर्मनाक करतूत; VIDEO वायरल#accidentdeadbody #deadbodythrownincanal #biharpolice #viralvideo #panchnama #postmortem #muzaffarpurpolice #crimeinbiharhttps://t.co/qnWxqHi8ro
— रिपब्लिक भारत (@Republic_Bharat) October 8, 2023
संपादकीय भूमिकाअशांना पोलीस म्हणावे कि कसाई ? अशा पोलिसांना अटक करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे ! |