निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २४३
‘बर्याच वेळा घरातील तरुणांचे वयस्कर माणसांशी पटत नाही. मोठ्यांचे चुकले की, तरुणांना राग येतो. ‘वयस्कर माणसे वयाने मोठी असूनही अशी का वागतात ?’, असा प्रश्न तरुणांना पडतो. मोठ्यांना वाटते लहानांनी पालटावे आणि लहानांना वाटते मोठ्यांनी पालटावे. अशा परिस्थितीत कुणीही नमते घेण्यास सिद्ध नसल्यास भांडणे विकोपाला जातात आणि घरातील सुख निघून जाते. अशा परिस्थितीत घरातील तरुणांनी दायित्व घ्यायला हवे. ‘म्हातारपण हे दुसरे लहानपण असते’, असे म्हणतात.
‘वयस्कर माणसे चुकीची वागतात’, असे वाटत असल्यास ‘ती त्यांच्या दुसर्या लहानपणात आहेत’, हे जाणून त्यांना समजून घ्यावे आणि त्यांना आधार द्यावा. उतारवयात स्वतःतील स्वभावदोष दूर करणे कठीण असते. त्यामुळे ‘वयस्करांनी त्यांच्यातील दोष घालवावेत’, अशी अपेक्षा ठेवू नये. तरुणांनी स्वतःमध्येच समजूतदारपणा हा गुण वाढवावा. असे केल्याने घरात वादाचे प्रसंग टाळण्यास साहाय्य होईल.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.९.२०२३)