व्हिडिओच्या माध्यमातून स्वातंत्र्योत्तर काळात हिंदूंच्या विरोधात साम्यवादी आणि कथित धर्मनिरपेक्षतावादी यांनी आखलेल्या षड्यंत्राचा भांडाफोड करणार !
(‘आफ्टरमॅथ’ म्हणजे एका अप्रिय घटनेमुळे झालेला दूरगामी परिणाम !)

नवी देहली – ‘प्राच्यम्’ नावाच्या प्रसिद्ध यूट्यूब चॅनलचा ‘साहेब (भाग २) – द आफ्टरमॅथ’ हा व्हिडिओ २८ सप्टेंबर या दिवशी यूट्यूबवर प्रदर्शित होणार आहे. या व्हिडिओची लक्षावधी हिंदू चातकासारखी वाट पहात आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात साम्यवादी आणि कथित धर्मनिरपेक्षतावादी यांनी हिंदूंच्या विरोधात आखलेल्या षड्यंत्राचा भांडाफोड करणारा हा व्हिडिओ असणार आहे.
यासंदर्भात ‘प्राच्यम्’कडून गेल्या २ आठवड्यांपासून जनजागृती केली जात आहे. गेल्या वर्षी या व्हिडिओचा पहिला भाग प्रदर्शित करण्यात आला होता. त्यामध्ये ‘मुसलमान आक्रमक आणि त्यानंतर ब्रिटीश यांनी हिंदूंवर कशा प्रकारे अत्याचार केले ?’, हे दाखवण्यात आले होते. ब्रिटिशांनी हिंदूंमधील ‘हिंदुत्व’ कशाप्रकारे संपवण्याचा अटोकाट प्रयत्न केला गेला आणि आज जे हिंदू दिसत आहेत, ते ब्रिटीश विचारसरणीचे ‘ब्राऊन साहेब’ आहेत, यावर प्रकाश टाकण्यात आला होता. हा व्हिडिओ हिंदूंमध्ये अत्यंत लोकप्रिय झाला होता. त्याला २० लाखांहून अधिक लोकांनी पाहिले होते.
सौजन्य : Prachyam
Jalna School Dance Row : संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !
CPI Vandalized Toll Gate : माकपच्या कार्यकर्त्यांकडून पथकर नाक्यावर शुल्क न भरता दादागिरी : तात्पुरता अडथळा तोडून पलायन
‘तिहेरी तलाक’ आणि ‘बहुपत्नीत्व’ यांवरून विधानसभेत गदारोळ
उत्तरप्रदेश : भगवान हनुमानाच्या मूर्ती तोडफोडीच्या प्रकरणी असद याच्यावर आरोप
५ राज्यांत लव्ह जिहादची ७ प्रकरणे उघड !
महाराष्ट्रात ४ महिन्यांत २५४ कोटी ५३ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले ! – CM Devendra Fadnavis