पुणे येथे व्‍यावसायिकाची ९१ लाख रुपयांची फसवणूक केल्‍याप्रकरणी ६ धर्मांधांना अटक !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – स्‍वत:चा कोणताही ‘इम्‍पोर्ट-एक्‍सपोर्ट’चा (आयात-निर्यातीचा) व्‍यवसाय नसतांना आमीष दाखवून अन्‍य एका व्‍यावसायिकाची फसवणूक केल्‍याप्रकरणी नादीर आबादी, सीमा उपाख्‍य रोहिया आबादी, मौलाना शोएब, खालीद आतार, माजीद आतार, इरम आतार यांच्‍यावर समर्थ पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे. (लोकसंख्‍येत अल्‍पसंख्‍य धर्मांधांची गुन्‍हेगारीत मात्र आघाडी ! – संपादक) या फसवणुकी प्रकरणी व्‍यावसायिक शेख लतिफ यांनी समर्थ पोलीस ठाण्‍यात तक्रार प्रविष्‍ट केली होती.

कोरोना महामारीच्‍या काळामध्‍ये कुणीही बांधकाम व्‍यवसायात गुंतवणूक करत नव्‍हते. त्‍या वेळी तक्रारदारास ‘इम्‍पोर्ट-एक्‍सपोर्ट’ व्‍यवसायातून ४ कोटी रुपयांचा परतावा मिळवून देण्‍याचे आमीष दाखवले आणि त्‍यांच्‍याकडून वेळोवेळी ९१ लाख रुपये घेतले. त्‍याकरता जादूटोणासारखे अघोरी कृत्‍यही केले. खोटा तावीज बनवून दिला. हा सर्व प्रकार ऑगस्‍ट २०२० ते ऑगस्‍ट २०२२ या काळात रास्‍ता पेठ येथे घडला.