१. ‘घरात श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केल्याच्या दिवसापासून तिचे विसर्जन होईपर्यंतच्या दिवसापर्यंत तिची प्रतिदिन पूजा आणि आरती करावी. घरातील सर्वांनी आरतीच्या वेळी उपस्थित रहावे.
२. श्री गणेशाची २१ नावे म्हणत त्याला २१ दूर्वा वहाव्यात. दूर्वा न मिळाल्यास २१ नावांचा मोठ्या आवाजात उच्चार करावा.
३. प्रतिदिन सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी असे ३ वेळा एखादे गणेशस्तोत्र म्हणावे. (Ganeshotsav, Ganesh Chaturthi, Ganapati)
४. देवाला दूर्वा, शमी, मंदारचे फूल किंवा तांबडे फूल वहावे.
५. आरतीची ध्वनीचकती न लावता सर्वांनी आरती म्हणावी. आरती पाठ नसल्यास पुस्तकात बघून आरती म्हणावी.
६. आरतीनंतर सर्वांनी संकटनाशन स्तोत्राचे ३ पाठ करावेत.
७. ‘श्री गजानन जय गजानन । श्री गजानन जय गजानन ।’ हे नामस्मरण किमान २१ वेळा करावे.
८. श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी श्री गणेशासमोर बसून डोळे मिटून ‘श्री गणेशा, मला आपले दर्शन व्हावे’, असे म्हणून प्रार्थना करावी. निश्चित आपल्याला श्री गणेशाच्या अस्तित्वाची जाणीव होईल.
९. श्री गणेशाच्या एखाद्या मंत्राचे अनुष्ठान करावे.
१०. गोष्टीरूप श्री गणेशपुराणाचे वाचन करावे.
११. प्रतिदिन गणपतीच्या २१ मूर्तींचे दर्शन घ्यावे.
१२. गणेशोत्सवात गणेशाचा विचार आणि चिंतन करावे. यामुळे आपण धन्य होऊन घरातील वातावरण मंगलमय होईल. मग आनंदच आनंद !’
(साभार : वार्तापत्र, ‘मयूरेश’, सप्टेंबर २०१६)