मुसलमान मुलाला शिक्षा केल्याच्या रागातून मारहाण

कोलकाता – हावडा जिल्ह्यातील उच्च माध्यमिक शाळेत शिकणार्या मुसलमान मुलाला शिक्षा दिल्याच्या रागातून मुसलमानांनी हिंदु शिक्षकाला मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी शेख मकबूल आणि शेख बिलाल या २ जणांना अटक केली आहे. या प्रकरणी काही जण पसार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
श्यामपूर येथील नौदा नयनचंद्र विद्यापीठ या शाळेत प्रसन्नजीत बिस्वास हे इंग्रजी विषय शिकवतात. ११ सप्टेंबर या दिवशी दहावीच्या वर्गात शिकणार्या मुसलमान मुलाचे वर्गात लक्ष नव्हते. त्यामुळे बिस्वास यांनी त्याच्या कानशिलात लगावली. त्यानंतर ही माहिती पसरताच मधल्या सुट्टीच्या काळात काही मुसलमान शाळेत घुसले आणि त्यांनी बिस्वास यांना मारहाण केली. या वेळी त्यांनी बिस्वास यांना अश्लील शिवीगाळही केली. बिस्वास यांना मारहाण केल्याचे वृत्त समजताच स्थानिक आणि शाळेचे विद्यार्थी यांनी संबंधितांना अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ अन्वेषण करून दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाबहुतांश मुसलमानांच्या मनाविरुद्ध घडल्यावर ते कायदा हातात घेतात. कायद्याचा धाक न राहिल्याचा हा परिणाम आहे ! |
बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !
शारीरिक संबंध ठेवतांना ती फसवणूक किंवा ब्लॅकमेल असल्यास तो ‘बलात्कार’ मानला जाईल ! – Madras High Court
(म्हणे) ‘श्रीकृष्ण मुसलमान होते आणि ५ वेळा नमाजपठण करायचे !’ – Maulana Jarjis Ansari
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !