राहुल गांधी यांच्या आरोपाला प्रत्युत्तर

लडाख – चीनने भारताची एक इंचही भूमी बळकावलेली नाही, अशा शब्दांत लडाखचे उप राज्यपाल आणि निवृत्त ब्रिगेडियर बी.डी. मिश्रा यांनी ‘लडाखमधील मोठा भूभाग चीनने गिळंकृत केला आहे,’ या राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. ते पुढे म्हणाले की, भारतीय भूमीवर आक्रमण करण्याचे दु:साहस कुणी केल्यास, त्याला चोख प्रत्युत्तर देण्यास आपले सैन्य सिद्ध आहे.
Not even a square inch’: Ladakh LG refutes China land occupying claim, says Army prepared to give bloody nose https://t.co/KL8bZ9w11c
— Aadit Kapadia (@ask0704) September 12, 2023
उप राज्यपाल मिश्रा यांनी म्हटले की, कुणाच्या विधानावर मी प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही; परंतु जी वस्तुस्थिती आहे, त्याविषयीच मी बोलत आहे. आपल्या सीमेवर मी प्रत्यक्ष पहाणी केली असून त्यावरून सांगू शकतो की, आपली एक इंचही भूमी चीनने बळकावलेली नाही. वर्ष १९६२ मध्ये जे घडले, त्याविषयी बोलणे निरर्थक आहे; परंतु आता अखेरच्या इंचापर्यंतचा आपला भूभाग आपल्याच कह्यात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
शिर्डी येथे ७०० किलो भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
कोंढवा (पुणे) येथील प्रदूषणकारी पशूवधगृह बंद करून अन्यत्र स्थलांतरित करा !
‘महा-एआय मॉडेल’द्वारे माहिती-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने शासनाचे महत्त्वाचे पाऊल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आपत्ती निवारणासाठी संबंधित विभागांनी सतर्क रहावे ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत