
बरेली (उत्तरप्रदेश) – येथे इकरा या मुसलमान तरुणीने हिंदु धर्मात प्रवेश करून आकाश नावाच्या तिच्या हिंदु प्रियकराशी विवाह केला. ८ सप्टेंबर या दिवशी इकरा हिने येथील अगस्त मुनि आश्रमात जाऊन शुद्धीकरण करून घेत हिंदु धर्म स्वीकारला. तिचे नाव प्रीती असे ठेवण्यात आले. यानंतर येथेच आकाशसमवेत तिचा विवाह लावून देण्यात आला. इकरा हिने सांगितले, ‘इस्लाममधील बहुविवाह, तिहेरी तलाक आदी चुकीच्या परंपरांना माझा विरोध आहे.’
गेल्या ५ वर्षांपासून इकरा आणि आकाश एकमेकांच्या प्रेमात होते. याला दोघांच्या कुटुंबियांकडून विरोध होता. त्यानंतर वर्ष २०२१ मध्ये ते घरातून पळून गेले होते. त्या वेळी इकरा अल्पवयीन होती. तिच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आकाश याला अटक केली. तो ४ मास कारागृहात होता, तसेच अल्पवयीन असल्याने इकरा हिला २ वर्षे आर्य समाजाच्या अनाथालयामध्ये ठेवण्यात आले होते. आकाशला जामीन मिळाला, तर इकरालाही २ वर्षांनी सोडण्यात आले.
म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्रातून रशियाचा नागरिक पसार
आरोंदा येथे अवैधरित्या वास्तव्य करणार्या रशियाच्या नागरिकाला कारावास
आतंकवादी कसाबने कारागृहात मटण बिर्याणी मागितल्याचे वृत्त जाणीवपूर्वक पेरले होते ! – ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम
हिंदुत्वनिष्ठ हर्षा यांची हत्या करणार्या आरोपींनी कारागृह ‘वॉर्डन’वर केले आक्रमण !
‘नीट’च्या प्रश्नपत्रिका पोचवण्यासाठी अमरावतीत १५ वाहनांचा ताफा !
अमली पदार्थ प्रकरणी अलीबाग येथून युक्रेनची महिला कह्यात