प्रतिवर्षी जानेवारीत ९ दिवस महोत्सव !

मुंबई, ९ सप्टेंबर (वार्ता.) – मुंबईत आंतरराष्ट्रीय महोत्सवाच्या आयोजनासाठी ‘मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सव फाऊंडेशन’ गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. प्रतिवर्षी जानेवारीमध्ये ९ दिवस महोत्सव आयोजित करण्यात येईल. हा महोत्सव लोकसहभागातून होईल. या फाऊंडेशनचे अध्यक्ष उद्योगपती आनंद महिंद्रा असतील. यामध्ये क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, हर्ष जैन, अमिताभ चौधरी, रॉनी स्क्रूवाला, पार्थ सिन्हा, निरजा बिर्ला हे मान्यवर असतील. मुंबईसह राज्यात वेगवेगळ्या पर्यटनस्थळांचा विकास आणि पर्यटन महोत्सवाद्वारे अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Here is a glimpse of the Mumbai International Festival’s foundation meeting led by hon Minister of Tourism and Mr. Anand Mahindra. pic.twitter.com/o2LUYQ8bsg
— Maharashtra Tourism (@maha_tourism) September 7, 2023
आतंकवादी कसाबने कारागृहात मटण बिर्याणी मागितल्याचे वृत्त जाणीवपूर्वक पेरले होते ! – ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम
हिंदुत्वनिष्ठ हर्षा यांची हत्या करणार्या आरोपींनी कारागृह ‘वॉर्डन’वर केले आक्रमण !
विशेष न्यायालयाने पोलीस उपअधीक्षकाचा जामीन फेटाळला !
अमली पदार्थ प्रकरणी अलीबाग येथून युक्रेनची महिला कह्यात
Congress Justifies Emergency Mindset : (म्हणे) ‘जर इंदिरा गांधी आज जिवंत असत्या, तर त्यांनी भाजपवर बंदी घालण्यास संकोच केला नसता !’ – राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत
आजपासून आर्.टी.ओ. कर्मचार्यांचा ‘बेमुदत संप’ !