कोल्हापूर – पेठवडगाव येथील सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या स्मारकाच्या विकासासाठी निधी अल्प पडू दिला जाणार नाही, यासाठी टप्प्याटप्प्याने निधी दिला जाईल. स्मारकासाठी १ कोटी रुपये आणि अंतर्गत रस्त्यांसाठी २ कोटी रुपये देण्यात येतील, अशी घोषणा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली. ते पेठवडगाव येथे नगर परिषदेत झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते. या प्रसंगी शिवसेना खासदार धैर्यशील माने, तहसीलदार कल्पना ढवळे यांसह अन्य उपस्थित होते.
माजी उपनगराध्यक्ष डॉ. अशोक चौगुले यांनी ‘महालक्ष्मी तलावात जाणारे पाणी नागरिकीकरण आणि औद्योगिकरण यांमुळे दूषित होणार आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार असल्याने यासाठी उपाययोजना करावी’, अशी सूचना केली. या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, प्रविता सालपे, अजय थोरात यांसह अन्य उपस्थित होते.