गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये भारताचा ध्वज फडकला : लोकांनी दिल्या ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ च्या घोषणा

इस्लामाबाद – गिलगिट-बाल्टिस्तानच्या लोकांना आता पाकिस्तानसोबत रहायचे नाही. गेल्या अनेक दिवसांपासून ते रस्त्यावर उतरून पाकिस्तान सरकारचा निषेध करत आहेत. आंदोलकांकडून ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या जात असून अनेक नागरिकांनी स्वतःच्या इमारतींवर भारताचा तिरंगा ध्वज फडकावला आहे.

पाकिस्तानने गिलगिट-बाल्टिस्तानमधील बरीच भूमी चीनला खाणकामासाठी दिली आहे. त्यामुळे तेथील लोकांना शेती करता येत नाही. शेतकर्‍यांना मोबदला न देता त्यांच्या भूमी हिसकावून घेतल्या आहेत. गिलगिट-बाल्टिस्तानमधील लोकांचे जीवन नरक बनले आहे. त्यामुळे त्यांचा पाकिस्तान सरकारवर राग असून त्यांना पाकिस्तानच्या राजवटीपासून स्वातंत्र्य हवे आहे.

पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांची भारतात समाविष्ट होण्याची मागणी

पाकव्याप्त काश्मीरमधील लोकही अनेक दिवसांपासून पाकिस्तान सरकारच्या विरोधात निदर्शने करत आहेत. ते ‘पाकिस्तान मुर्दाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद’ च्या घोषणाही देत आहेत. ते भारतात समाविष्ट होण्याची मागणी करत आहेत. ‘पाकिस्तान सरकारने इस्लामच्या नावावर आमची दिशाभूल करणे थांबवावे’, असे आवाहन पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांनी सरकारला केले आहे.