
निपाणी (कर्नाटक) – शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून लोकसंख्येच्या मानाने पूर्वीच्या पाणी योजनेद्वारे शहराला पाणीपुरवठा करतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शहरवासियांना भविष्यात भरपूर आणि शुद्ध पाणी मिळावे, यासाठी शहरात ‘तीन ओव्हरहेड टँक’, ‘फिल्टर हाऊस’ आणि नवीन पाणीवाहिनी यांसाठी २० कोटी ५० लाख रुपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे संमतीसाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती भाजप आमदार सौ. शशिकला जोल्ले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आमदार सौ. शशिकला जोल्ले पुढे म्हणाल्या, ‘‘निपाणीकरांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटावा, यासाठी प्रयत्न चालू आहेत. पाणीपुरवठा करणारी वाहिनी जुनी झाली असून अनेक ठिकाणी गळती लागली असल्यामुळे पाणी वाया जात आहे. त्यामुळे नवीन वाहिनी आणि ‘फिल्टर हाऊस’ची व्यवस्था करण्यात येणार आहे. शासनाकडे पाठवलेल्या प्रस्तावाला लवकरच संमती मिळेल. जवाहर तलावात पाणीसाठा वाढवा, यासाठी गाळ काढण्याचे काम चालू आहे, तसेच दूधगंगा नदीतून आणखी पाणी योजना राबवण्याचा विचार चालू आहे.’’ या वेळी नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी, माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले, नीता बागडे, सुनील पाटील, राजू गुंदेशा, भाजप शहराध्यक्ष प्रणव मानवी यांसह अन्य उपस्थित होते.
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण
आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना सिंधु नदीचे पाणी मिळणार नाही ! : Defence Minister Rajnath Singh
UP Bulldozer Action : श्री चामुंडा मंदिराच्या भूमीवरील धार्मिकस्थळाचे अतिक्रमण हटवले !