जे श्री शिवप्रतिष्ठानच्या धारकर्‍यांना करता येते, ते पोलीस का करू शकत नाहीत ?

‘२३ ऑगस्ट २०२३ या दिवशी उज्जैन येथून एक हिंदु महिला (वय २३ वर्षे) रागाच्या भरात घर सोडून पळाली असून ती इंदूर-कोच्चुवेल्ली (गाडी क्र.२०९३२) या रेल्वेगाडीमध्ये आहे. ही गाडी दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी चिपळूण येथून सुटली आहे. या महिलेला केरळला नेण्यासाठी एक ख्रिस्ती व्यक्ती तिच्या मागे लागली आहे’, असे त्या महिलेच्या डब्यात असलेल्या सहप्रवाशांनी संपर्क करून येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांना कळवले. त्यानंतर धारकर्‍यांनी रत्नागिरी येथील रेल्वेस्थानकावर एकत्र येत हा विषय रेल्वे पोलिसांना सांगितला. रेल्वेगाडी रत्नागिरी स्थानकावर येताच त्या महिलेला पोलिसांनी कह्यात घेतले आणि तिला केरळ येथे घेऊन जाणारा फिलिप्स फ्रान्सिस मस्करेहस या ख्रिस्त्यालाही कह्यात घेतले. त्यामुळे हिंदु महिलेला केरळला घेऊन जाण्याचा ख्रिस्त्याचा डाव श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांच्या जागरूकतेमुळे उधळला गेला.’ (२६.८.२०२३)