वर्ष १९४७ मध्ये धर्माच्या आधारावर देशाची फाळणी झाली, हे आपण सर्वजण जाणतोच. मुसलमान बहुसंख्य होते; म्हणून त्यांना पाकिस्तान दिले. मग जे उरले ते काय ? ज्या न्यायाने मुसलमानांना पाक दिला, त्याच न्यायाने हिंदूंना हिंदुस्थान मिळाला आणि या देशाला ‘हिंदु राष्ट्र’
घोषित केले असते, तर हा देश आज ज्या भयानक संकटात आहे अन् ज्या आक्राळविक्राळ समस्यांशी झगडत आहे, त्यातील अर्ध्या अधिक समस्या निर्माणच झाल्या नसत्या. आज विविध सैन्यदलेे आणि पोलीसदले देशातील दंगली रोखण्यातच व्यस्त आहेत. या दंगली होतात तरी कुठे ? अनेक राज्यात जे प्रत्यक्ष अनुभव सांगितले, त्यातून दंगली मुसलमानबहुल भागातच होतात, हे स्पष्ट झाले. या देशातील दंगली आणि त्यात होणारी हिंदूंची जीवित अन् वित्त हानी रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणा मोठ्या प्रमाणात अडकल्या आहेत. मुळात हे हिंदु राष्ट्र घोषित केले असते, तर ही इतकी मोठी संकटे आलीच नसती. या लोकांना कधीपर्यंत अल्पसंख्यांक समजणार ? हेही स्पष्ट करण्यात आलेले नाही. आता तर अनुसूचित जातीजमातींना ज्या आधारावर आरक्षण मिळत होते, त्याच आधारावर मुसलमानांनाही आरक्षण मिळणार आहे. त्यांना शासकीय नोकर्यांमध्येसुद्धा आरक्षण मिळणार आहे. या सगळ्या समस्या जर आपल्याला नष्ट करायच्या असतील, तर ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्याविना आपल्याला दुसरा पर्यायच नाही. त्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना जेवढ्या लवकर करू, तेवढे या देशाच्या भविष्यासाठी उत्तम होईल.