आरोपी खिलेश्वर याला अटक
राजनांदगाव (छत्तीसगड) – येथील खुज्जी विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या आमदार छन्नी चंदू साहू या जोधरा गावात एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या होत्या. या वेळी त्यांच्यावर चाकूद्वारे आक्रमण करण्यात आले. यात त्यांच्या हाताला दुखापत झाली. पोलिसांनी आरोपीला लगेचच कह्यात घेतले. खिलेश्वर असे आरोपीचे नाव आहे. आक्रमणाच्या वेळी तो नशेत होता, असे सांगण्यात येत आहे.
Chhattisgarh | A woman Congress MLA suffered injuries after a man allegedly attacked her with a knife in Rajnandgaon district yesterday
MLA Chhanni Chandu Sahu says, “I had gone to Jodhra village for Bhoomi Poojan. A 21-22-year-old boy came from behind and attacked me with a… pic.twitter.com/m0m3N7msed
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) August 20, 2023
छत्तीसगडमधील विरोधी पक्ष भाजपने या घटनेचा निषेध केला असून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप केला आहे. ‘सत्ताधारी पक्षाचे आमदारच सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्यांच्या सुरक्षेचे काय ? हे भूपेश बघेल सरकारचे अपयश आहे’, अशी भाजपने टीका केली आहे.
संपादकीय भूमिकाकाँग्रेसच्या राज्यात स्वपक्षाच्याच महिला आमदार असुरक्षित असतील, तर सर्वसामान्य जनता कधीतरी सुरक्षित असेल का ? |