उत्तरप्रदेशात २ मुसलमानांनी एका हिंदु महिलेवर केला सामूहिक बलात्कार

हिंदुबहुल उत्तरप्रदेशमध्ये हिंदु महिला असुरक्षित !

कौशांबी (उत्तरप्रदेश) – एका हिंदु महिलेवर २ मुसलमानांनी  सामूहिक बलात्कार केला. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे; मात्र अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.

पीडित महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे,

१. मी कडा धाम येथील शीतलामाता मंदिरात पूजा करून घरी परतत असतांना अंधार पडला होता. मी बसची वाट पहात असतांना, शेर महंमद हा जिल्हा पंचायत सदस्य आणि जुबेर अहमद यांनी मला त्यांच्या चारचाकी गाडीत बसवले.

२. त्यानंतर दोघांनी मला जंगलात नेले आणि तेथे माझ्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यांनी या घटनेचा व्हिडिओही बनवला. याविषयी कुणाशी बोलल्यास मला जिवे मारण्याची धमकी दिली.

३. त्यानंतर रात्री १० वाजण्याच्या सुमारास आरोपींनी मला एका चौकात टाकले आणि ते निघून गेले. रात्री कशीतरी मी तिच्या घरी पोचली आणि हा सर्व प्रकार मी माझ्या पतीला सांगितला. त्यानंतर मी पतीसह कौशांबी येथील कडधाम पोलीस ठाण्यात जाऊन आरोपींच्या विरोधात सामूहिक बलात्काराची तक्रार प्रविष्ट केली.

संपादकीय भूमिका 

अशांना भर चौकात फाशीची शिक्षा देण्याची कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !